पुरे तुझा हा रडवेला स्वर;
चल जगण्याशी दोन हात कर!
तुझे नि माझे जमणे नाही....
जा बाई तू मला माफ कर...!
दुर्गंधी लपणार कोठवर?
जरी लावले उंची अत्तर !
मीही मित्रा ध्यास घेतला....
कितीक करशील माझा वापर?
रानफुले शिकतात उन्हातच...
कुठली शाळा? कुठले दप्तर?
आता असतील प्रश्नही माझे
हवे तसे मी देईन उत्तर...!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
पुन्हा आभाळ दाटले
पुन्हा आभाळ दाटले तिच्या गहिर्या डोळ्यात; पुन्हा बरसल्या धारा तिच्या सुन्या काळजात...! ओळखीच्या पावसाने तिला वाटेत गाठले, चिंब भिजवून माती ...
-
पुन्हा आभाळ दाटले तिच्या गहिर्या डोळ्यात; पुन्हा बरसल्या धारा तिच्या सुन्या काळजात...! ओळखीच्या पावसाने तिला वाटेत गाठले, चिंब भिजवून माती ...
-
कुठे राहते शिल्लक काही काळाच्या ओघातं तुटे पतंगाची दोरी जाते अस्तित्वं उडतं.... ऊरी रेंगाळते जरा वेडी जगण्याची आसं उभ्या आयुष्याला होता जरी ...
-
तुला जरी मी भार वाटतो मला तुझा आधार वाटतो उजेड आहे नक्की थोडा फार जरी अंधार वाटतो छळणा-यांना छळणे म्हणजे जन्मसिद्ध अधिकार वाटतो गल्लीत...