उदास,खाली मनास घेऊन फिरतो आम्ही
माहीत नाही कोणासाठी झुरतो आम्ही
लाट ऊसळते परीस्थितीची एकाएकी
कसेबसे मग प्राण्पणाने तरतो आम्ही
दिवस आजचा अमुच्यासाठी खोटे नाणे
रोज रुपेरी आठवणीना स्मरतो आम्ही
साथ द्यावया कुणीच नसते असून सगळे
कधी कधी मग असे एकटे उरतो आम्ही
कळावयाच्या आत संपते सगळे काही
सरणावतती संथ गतीने सरतो आम्ही
अमोल शिरसाट,
अकोला.
९०४९०११२३४
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
पुन्हा आभाळ दाटले
पुन्हा आभाळ दाटले तिच्या गहिर्या डोळ्यात; पुन्हा बरसल्या धारा तिच्या सुन्या काळजात...! ओळखीच्या पावसाने तिला वाटेत गाठले, चिंब भिजवून माती ...
-
पुन्हा आभाळ दाटले तिच्या गहिर्या डोळ्यात; पुन्हा बरसल्या धारा तिच्या सुन्या काळजात...! ओळखीच्या पावसाने तिला वाटेत गाठले, चिंब भिजवून माती ...
-
कुठे राहते शिल्लक काही काळाच्या ओघातं तुटे पतंगाची दोरी जाते अस्तित्वं उडतं.... ऊरी रेंगाळते जरा वेडी जगण्याची आसं उभ्या आयुष्याला होता जरी ...
-
तुला जरी मी भार वाटतो मला तुझा आधार वाटतो उजेड आहे नक्की थोडा फार जरी अंधार वाटतो छळणा-यांना छळणे म्हणजे जन्मसिद्ध अधिकार वाटतो गल्लीत...