Thursday, October 25, 2007

पुन्हा आभाळ दाटले

पुन्हा आभाळ दाटले
तिच्या गहिर्‍या डोळ्यात;
पुन्हा बरसल्या धारा
तिच्या सुन्या काळजात...!


ओळखीच्या पावसाने
तिला वाटेत गाठले,
चिंब भिजवून माती
पुन्हा मिठीत घेतले....


आल्या पावली पाऊस
पुन्हा फिरला माघारी,
ओली जखम राहिली
तिच्या खोल खोल ऊरी...


अमोल शिरसाट.

0 टिप्पणियाँ: