२८ ऑक्टो, २०२०

पाहु दे तुजला घडीभर आणखी काही नको

पाहु दे तुजला घडीभर आणखी काही नको
हात हाती हा जरा धर आणखी काही नको

मागणे इतकेच आहे फक्त पंखांना मिळो
मोकळे उडण्यास अंबर आणखी काही नको

सैलही होऊ नये गळफासही वाटू नये
ठेव हे नात्यात अंतर आणखी काही नको

#अमोलशिरसाट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पुन्हा आभाळ दाटले

पुन्हा आभाळ दाटले तिच्या गहिर्‍या डोळ्यात; पुन्हा बरसल्या धारा तिच्या सुन्या काळजात...! ओळखीच्या पावसाने तिला वाटेत गाठले, चिंब भिजवून माती ...