२५ जुलै, २०१८

विषय संपला

शोध तुझे तू नवीन रस्ते विषय संपला
मला पाहिजे तसे जगू दे विषय संपला

कोकीळेसही भुरळ पडावी तुझ्या गळ्याने
माझे असु दे बेसुर गाणे विषय संपला

पत्र गुलाबी प्रेमाने पाठवा परंतू
उत्तर जर का नाही आले विषय संपला

छान तुझा संसार चालला ; कमी कशाची ?
तिच्या घरी ती मजेत आहे विषय संपला

रात्री अपरात्रीला येते फुटून दुखणे
रोज सकाळी जरी वाटते विषय संपला

त्रुटीत होती अडकुन फाइल महिनोमहिने
फक्त जरासे वजन ठेवले विषय संपला

वजीर गेला... हत्ती घोडे प्यादे मेले
नंतर एका चेकमेटने विषय संपला

© अमोल शिरसाट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पुन्हा आभाळ दाटले

पुन्हा आभाळ दाटले तिच्या गहिर्‍या डोळ्यात; पुन्हा बरसल्या धारा तिच्या सुन्या काळजात...! ओळखीच्या पावसाने तिला वाटेत गाठले, चिंब भिजवून माती ...