११ जुलै, २०१८

जीव अडकला नजरेच्या सापळ्यात आहे

जीव अडकला नजरेच्या सापळ्यात आहे
एक अनोखी तऱ्हा तिच्या पाहण्यात आहे

रीत जगाची पाहुन थोडी भीती वाटते
हातामध्ये गुलाब, चाकू खिशात आहे

शहराने आखली अताशा नवी योजना
गाव बिचारे अजूनही संकटात आहे

जीर्ण झोपडी नेहमीच संकटात असते
त्यात पोरगी तरणीताठी घरात आहे

कशी नासली एकी तुमची कारण शोधा
मीठ टाकले कुणीतरी या दुधात आहे

कुठलाही कोलाहल नाही,  गर्दी नाही
मध्यरात्रीला शहर मनाचे निवांत आहे

#अमोलशिरसाट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पुन्हा आभाळ दाटले

पुन्हा आभाळ दाटले तिच्या गहिर्‍या डोळ्यात; पुन्हा बरसल्या धारा तिच्या सुन्या काळजात...! ओळखीच्या पावसाने तिला वाटेत गाठले, चिंब भिजवून माती ...