तुला जरी मी भार वाटतो
मला तुझा आधार वाटतो
उजेड आहे नक्की थोडा
फार जरी अंधार वाटतो
छळणा-यांना छळणे म्हणजे
जन्मसिद्ध अधिकार वाटतो
गल्लीत गेल्यावर कुत्राही
वाघासम झुंजार वाटतो
मुळात असते कीड जिभेला
पोटाचा आजार वाटतो
नव्या युगाची तांत्रिक अडचण
जिवंत माणुस ठार वाटतो
श्वास कोंडतो किती कळ्यांचा
फुलणे जेव्हा भार वाटतो ...
- अमोल शिरसाट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा