गाजावाजा करत निघाले दिल्लीतुन
येता येता हवेत विरले अच्छे दिन
अमुच्या बरबादीचा आढावा घेण्या
काल विमानामधून फिरले अच्छे दिन
निवडुंगाचे पीक उगवले असे कसे
यंदा आम्ही जरी पेरले अच्छे दिन
सर्व्हिस लाइनमध्येही भरते शाळा
प्लास्टिक वेचत वेचत शिकले अच्छे दिन
खिशास परवडली नाही स्वप्ने साधी
हताश होउन घरी परतले अच्छे दिन
..........................
#अमोलशिरसाट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा