जरा सावधपणे पाऊल उचला लोकहो आता
भुकंपाने इथे आभाळही खाली पडू शकते
सदेही जर कुणी गेलाच वैकुंठी नवल कसले?
तसेही आमच्या देशात काहीही घडू शकते
जरी मी आणले ओढून ओठांवर हसू उसने
मनाची चलबिचल आई बरोबर ओळखू शकते
तपासा नीट डोळे जाळण्या आधीच प्रेताचे
कुणाला पाहण्याची राहिली इच्छा असू शकते
नका वस्तीत येऊ आमच्या; ती कॉलनी झाडा
युगांची धूळ उंची कोटही काळा करू शकते
#अमोलशिरसाट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा