३ जुलै, २०१८

नवी घोषणा पोकळ आहे

नवी घोषणा पोकळ आहे
पेल्यामधले वादळ आहे

किती आक्रमक भाषण असते
आतुन वासा पोकळ आहे

गजबलेले शहर मनाचे
आठवणींची वर्दळ आहे

जिवंत आहे अजून वारा
पानांमध्ये सळसळ आहे

धार तिच्या नजरेला आली
डोळ्यांमध्ये काजळ आहे

बीज तडकते अंकुर येतो
पुर्णत्वाची तळमळ आहे

- अमोल शिरसाट

पुन्हा आभाळ दाटले

पुन्हा आभाळ दाटले तिच्या गहिर्‍या डोळ्यात; पुन्हा बरसल्या धारा तिच्या सुन्या काळजात...! ओळखीच्या पावसाने तिला वाटेत गाठले, चिंब भिजवून माती ...