आंधळ्याचे सोंग कोणी घेतले माहीत आहे
योजनांचे पीठ कोणी चोरले माहीत आहे
पाच वर्षांनी नव्याने लागते बोली मतांची
लोकशाहीला विकाया काढले माहीत आहे
लेखणीचे टोक होते वाकले भलत्या दिशेला
छापताना खूप काही गाळले...माहीत आहे
रोज अपराधी कसे सुटतात हे आश्चर्य नाही
कायद्याला भोक मोठे ठेवले माहीत आहे
आव हा आणू नका साहेब कैवारीपणाचा
दृष्टचक्रातून कोणी तारले माहीत आहे
© अमोल शिरसाट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा