४ जुलै, २०१८

वेळ नाही येत सांगुन वेळ मित्रा

वेळ नाही येत सांगुन वेळ मित्रा
जीवनाचा हा घडीभर खेळ मित्रा

वाढले प्रेमाविना त्यांचे कुपोषण
लेकरांना दे जरासा वेळ मित्रा

पेरले आहेस जे; उगवेल नक्की
धीर धर... तू थांब थोडावेळ मित्रा

वाढली आहे तुझ्या हृदयात भेसळ
रक्त कोठे राहिले निर्भेळ मित्रा

सोड आता तू असे धरसोड करणे
होत आहे जीवनाची भेळ मित्रा

#अमोलशिरसाट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पुन्हा आभाळ दाटले

पुन्हा आभाळ दाटले तिच्या गहिर्‍या डोळ्यात; पुन्हा बरसल्या धारा तिच्या सुन्या काळजात...! ओळखीच्या पावसाने तिला वाटेत गाठले, चिंब भिजवून माती ...