किती तू बोलताना टाळल्या गोष्टी
तरी मी वाचल्या डोळ्यातल्या गोष्टी
तुझी तत्वे तुझे स्टेटस तुझा ईगो
न जाणे तू किती सांभाळल्या गोष्टी
दिले हे जीवनाने छान अनुभव पण
किती माझ्या जिवावर बेतल्या गोष्टी
तुला जर होत आहे त्रास तुटण्याचा
विनाकारण कशाला ताणल्या गोष्टी
लपवलेल्या खजीन्या सारख्या जपतो
मनाच्या मी तळाशी ठेवल्या गोष्टी
उपाशी लेकराला भाकरी द्याना
नका सांगू अशा बागेतल्या गोष्टी
जरा करुया कमी नात्यातली कटुता
चला लक्षात ठेवू चांगल्या गोष्टी
#अमोलशिरसाट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा