जन्म सारा दानपात्रासारखा
मृत्यु येतो अन्नछत्रासारखा
जीवना गुंता तुझा वाटे मला
बीजगणितातील सुत्रासारखा
ती जशी गेली तसा आहे उभा
मी कधीपासून चित्रासारखा
सारखा चर्चेत आहे आजही
मी निनावी प्रेमपत्रासारखा
काय सांगू शेवटी... जगलो कसा?
कारखान्यातील यंत्रासारखा
#अमोलशिरसाट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा