२२ ऑक्टो, २००७

एकलेपणात

एकलेपणात
मन गाई गाणे
कुणाचेच नाही
मज घेणे देणे.

तरी पुन्हा पुन्हा
घेरते निराशा
कुणी तरी यावे
मन करी आशा.

एकलेपणात
थांबू पाही श्वास
जितेपणी होतो
मरणाचा भास.

रित्या घागरीत
घोंघावतो वारा
उदास एकाकी
आसमंत सारा....!

अमोल शिरसाट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पुन्हा आभाळ दाटले

पुन्हा आभाळ दाटले तिच्या गहिर्‍या डोळ्यात; पुन्हा बरसल्या धारा तिच्या सुन्या काळजात...! ओळखीच्या पावसाने तिला वाटेत गाठले, चिंब भिजवून माती ...