२१ नोव्हें, २००७

नवाई

तुया हातच्या चुड्याची मले सदाई नवाई
टिचरली एक जरी, माह्या जिवाले जिवाई.

तुवं लाजून हासनं मले सदाई हरिकं,
तुया हासन्यात दिसे चांदन्याची झलकं...
तुया लाजन्यानं भेटे जगन्याची वं दवाई....

गोऱ् यागोमट्या रूपाले लागे नटनं काहाले?
त्यात शिनगार तुवा मले लावते झुराले...
तुले पाहून रायतो सपनात दिवसाही..

तुही नजर वं रानी कशी जुलूम ढायते,
बिना ईस्तोवाची माह्या जिवाले वं जायते.
माही नजरही तुले न्याहारते जईतई...

यता जाता खेपी तुले ऐना झुकूझुकू पाहे,
तुया रूपाची कायनी आज फुलं फुलं गाये...
तुले पाहूनचं व्हते माही साजरी दिवाई...

अमोल शिरसाट.

पुन्हा आभाळ दाटले

पुन्हा आभाळ दाटले तिच्या गहिर्‍या डोळ्यात; पुन्हा बरसल्या धारा तिच्या सुन्या काळजात...! ओळखीच्या पावसाने तिला वाटेत गाठले, चिंब भिजवून माती ...