नसू दे झाड एखादे इथे अंगण कुठे आहे?
तुझ्या या वेल फर्नीशड् फ्लॅटला घरपण कुठे आहे?
उभारा उंच भिंती माणसांमध्ये चिरेबंदी
हवेला रोखता यावे असे कुंपण कुठे आहे
विषय येतो नकोसा अन् पुन्हा होते सुरू भांडण
जरा समजून घे की नेमकी अडचण कुठे आहे
जिवावर बेतला होता जरीही घाव लढताना
अता मी दाखवत असतो खुशीने, व्रण कुठे आहे
निघावी स्वच्छ ज्याने माणसांची जात कायमची
जरा सांगा तुकारामा असा साबण कुठे आहे
सिमेंटी जंगलांच्या आड लपल्या तारका सगळ्या
चिमुकल्यांचे अता शहरात तारांगण कुठे आहे
©अमोल शिरसाट
अकोला.