अंधारालाही थोडीशी वाट दिसावी...
मिणमिणत्या ज्योतीने पणती तेवत असते
तिला पाहिजे असतो कोणी तिच्यासारखा
माझी कविता एकांताशी बोलत असते
काही केल्या द्रुष्टी अमुची बदलत नाही
जरी नवनवी आव्हाने ती पेलत असते
नदी असो वा उधाणलेल्या समुद्र लाटा
माश्याला पाण्यात पोहणे अवगत असते
तिला आठवण येते त्याची आता जेव्हा
कोसळणाऱ्या सरी एकटी झेलत असते
© अमोल शिरसाट
अकोला