Wednesday, November 21, 2007

राधा

डोळ्यांमध्ये जमू लागली
पुन्हा तीच विराणी,
गहिवरलेली एक आठवण
अन् थोडेसे पाणी.


पुन्हा एकदा जीव जाळण्या
वैरीण सांज परतली,
थकले डोळे वाट
पाहता राधा केविलवाणी.


अमोल शिरसाट.

0 टिप्पणियाँ: